राष्ट्रवादीला शहरातील चाळीस वॉर्डात उमेदवार सापडेना

Foto
औरंगाबाद :  औरंगाबाद महापालिकानिवडणुकीसाठी जवळ् जवळ  सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली  आहे. सर्व 115 वार्डात उमेदवार उभे करून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा दावा  करणार्‍या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाकडे अनेक  वॉर्डात उमेदवाराचे भेटलेले नाही. इच्छूक  उमेदवाराकडून आठ दिवस अर्ज भरून  घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने इच्छुकांकडून अर्जासाठी रुपयाही न घेता  फुकटात फ़ॉर्म दिलेही व  भरून घेतले. शहरातील एकशे पंधरा वार्ड असतांना पक्षा कडे पंचाहत्तर वार्डासाठी  फक्त 175 इच्छूकांनी अर्ज दाखल केले. शहर सचिव सलीम शेख  यांनी या संदर्भात  माहिती  दिली. अपेक्षे पेक्षा कमी वार्डासाठी  इच्छूकांनी अर्ज दाखल केले असल्याची  कबुली ही त्यांनी दिली. शहरात पक्ष संघटना मजबूत नसल्याने तसेच अंतर्गत लाथाडया मुळे संघटना वाढली नाही. वर्तमान  महापालिकेत तर राष्ट्रवादीचे फक्त चारच  नगरसेवक आहेत.या वरून शहर  संघटनेची किती दुरावस्था आहे हे स्पष्ट होते. आजच्या  घडीला सत्तेत असणार्‍या व नेहमी  आर्थिकरित्या संपन्न मानल्या जाणार्‍या  पक्षाची अवस्था सुधारण्यासाठी नव्या  चेहर्‍यांना संधी देण्याची गरज आहे. एके  काळी कांग्रेसचा गड असलेल्या ऐतिहासिक  शहरावर गेली तीस वर्षे राजकीय दृष्टीने  शिवसेनेनेच  कब्जा केला आहे. कित्येक वर्षें काँग्रेस ते  राष्ट्रवादी व  समाजवादी   पक्षाकडे भरकटणारा मुस्लिम मतदार आता एकटवला आहे. गेल्या निवडणूकीत  एमआयएमचे पंचवीस नगरसेवक निवडून आले  हेच मुस्लिम एकटवल्याचे प्रमाण आहे. एकूणच  काँग्रेस  राष्ट्रवादीला  मुस्लिम  वार्डात  सध्या स्पेस नाही. राष्ट्रवादीचे सर्व नेते मुंबईत ठाण मांडून  बसले आहेत. राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने वरिष्ठ नेत्यांशी शहर जिल्ह्यातील नेते चर्चा करणार आहेत. वार्ड  रचनेचा घोळ संपल्या नंतर आता कोणता  पक्ष कोनाशी आघाडी करणारयाकडे सर्व  शहरवासियांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी  बरोबरच कांग्रेसलाही सर्व वार्डात उमेदवार  नाही. शिवसेने बरोबर आघाडी करणे  या दोन्ही पक्षांची गरज आहे. आघाडी न  झाल्यास कांग्रेस राष्ट्रवादीची पुनः दैना उडण्याची शक्यता आहे. या  मुळेच  स्थानिक नेते आघाडी साठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान पालिका निवडणुकीत  आघाडी संदर्भात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा व आढावा घेण्यासाठी जयंत पाटील 7 मार्च रोजी शहरात येणार असल्याची माहिती सुत्रा कडून देण्यात आली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker